कोल्हापूर, ता. ६ — (प्रतिनिधी) आजकाल कोणावर कशी वेळ येईल,हे कोणी सांगू शकत नाही. पण ज्या वेळी एखादा माणूस संकटात सापडतो, आणि जेव्हा त्यालाा मदतीची गरज असते तेव्हा कोल्हापूरकर त्याच्या मदतीला धाऊन जातात, हा इतिहास आहे आणि याच इतिहासाची पुनरावृती शनिवारी कोल्हापूरमधील सीबीएस स्टँडवर पाहायला मिळाली. एका कर्तव्यदक्ष पोलिसांनी आणि एका जागरूक नागरिक याच्यामुळे एकाचे प्राण वाचले.
आज आपले जीवन प्रचंड धावपळीचं आणि ताणतणाव याने भरलेले आहे आणि याच तणावामुळे माणसाला विविध प्रकारचे आजार जडायला वेळ लागत नाही. आता हेच पहा ना, शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती सीबीएस स्टँड जवळून जात होती. त्यांचे वय वर्ष अंदाजे ६० असावे. अचानक त्यांच्या छातीतून कळ आली, त्यांना या कळा असह्य होऊ लागल्या. या मार्गावरून जाणारे पोलीस अमोल पाटील आणि फैजल पेंढारी यांनी ही बाब हेरली. या दोघांनी त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र,ते गृहस्थ काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे श्री. पाटील आणि श्री. पेंढारी यांनी क्षणाचाही विलंब न लावता १०८ रुग्ण वाहिका घटनास्थळी बोलवली आणि त्या व्यक्तीला त्या वाहनात घालून उपचारासाठी
पाठउन दिले. रुग्णाणवाहिकेत दाखल केल्यावर ते जोरजोराने ओरडत होते.
त्यामुळे या दोन जागरूक नागरिक यांनी प्रसंगावधांन दाखवल्याने एका संकटातील व्यक्तीचे प्राण मात्र वाचले. सहृदयता, माणुसकी, आपुलकी दाखवल्यामुळे एकाचे प्राण वाचले आणि ते वाचवण्यासाठी खटाटोप करणाऱ्यांच्या पदरी पुण्य पडले, असे म्हटले तर ते गैर ठरणार नाही.