उद्यमनगर मधील पांजरपोळ हे भाकड जनावरांचे वृद्धाश्रम आहे. या ठिकाणी असणाऱ्या सुमारे 400 गाई, म्हशींच्या शेणा पासून शेणखत तयार केले जाते. कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटक राज्यातून येथील शेणखताला चांगली मागणी असून वर्षाला सुमारे पाचशे टन खत विक्रीस जाते. प्रति किलो आठशे रुपये असा येथील शेणखताचा दर आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेले कोल्हापुरातील पांजरपोळ हे ठिकाण भाकड जनावरांसाठी वरदान ठरले आहे. पांजरपोळला वयोवृद्ध किंवा मोकाट, जखमी, दिव्यांग जनावरांचे वृद्धाश्रम असेही म्हणतात.
या संस्थेत सध्या सुमारे 400 गाई आणि म्हशी आहेत. त्यापैकी १० ते १५ गाई, म्हेशी दुभती आहेत. पांजरपोळ मध्ये असणाऱ्या सुमारे चार गुंठे क्षेत्रांमध्ये या जनावरांचे शेण एकत्र केले जाते. या ठिकाणी सुमारे पाच हजार टन इतकी शेणखत साठवण क्षमता आहे. अर्थात, वर्षाला इतके खत येथे साठते. या शेणाला प्रति किलो आठशे रुपये टन इतका दर आहे. कर्नाटक राज्यातील हिडकल डॅम शेजारी शेतकऱ्यांनी ऊस लागवड, भाजीपाला अशी शेती केली आहे. या शेतीसाठी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी येथून सुमारे सात ते आठ टन शेणखत सध्या घेऊन जात आहेत. त्यांची शेती या या खताने सुजलाम सुफलाम बनत आहे.
वर्षाला सुमारे 500 टन शेणखत येथून विक्रीस जाते. कर्नाटकसह तासगाव, पलूस आणि कोल्हापूर जिल्ह्यातील देखील शेतकरी येथील शेणखत घेऊन जातात.
शेती व्यतिरिक्त बागेसाठी एक 50 किलोचे पोते देखील 220 रुपयांना विक्रीस जाते. याशिवाय गाई म्हशीचे दूध, गोमूत्र यांची चांगली विक्री होत आहे, अशी माहिती येथील डॉ. राजकुमार बागल यांनी शुक्रवारी समाजधन टाइम्सशी बोलताना दिली.