भीतीच्या छायेखाली
जगत आहोत आम्ही
जगावर नैसर्गिक संकट कधी येईल याची देईल कोण खात्री…
ते येईल रात्री अपरात्री…
ते कधी येईल वाजत गाजत…कधी येईल दबक्या पावलाने…
कधी आधी सूचना न देता ही …
काय आहे जगाचे भविष्य..किती आहे शिलक माणसाचे आयुष्य…
घड्याळाचा काटा टिक टिक करत पुढे जात आहे…
आपल्या वसुंधरेच आयुष्य मान कमी होत आहे….
आस्मानी आणि सुलतानी संकट आलेच तर…
कमावलेल एक दिवस गंगेला जाऊन मिळणार…
माणूस अस्तित्वात नसेल तर संपती कोणासाठी उरणार…?