नाते तुझे नि माझे नाते
मला कधी नाहीच समजले
तुझ्या सोबत राहण्याचे स्वप्न पाहिले
पण ते अधुरे राहून गेले
तुझे सुमधुर बोलणे
माझ्या हसण्यावर तुझे दिलखुलास हसणे
तुझी मस्करी केल्यावर
तुझे माझ्यावर रुसणे
मी तुझी समजूत काढणे
तु तरीही माझ्यावर चिडणे
सर्वच काही माझ्यासाठी होते स्वप्नांसारखे…
नाते तुझे नि माझे नाते
मला कधी नाहीच समजले…
तुझे माझ्यावर विसंबने
माझे तुझ्यावर प्रेम करणे
तू दूर गेल्यावर माझे तुझ्यासाठी रडणे
तू ही माझ्या प्रेमात पडणे आणि माझ्या विरहात दिवस काढणे…
नाते तुझे नि माझे नाते
मला कधी नाहीच समजले…
तुझे एक दिवस मला सोडून जाणे
माझे तुला मागणे
हे की माझे तुझ्यासाठी आहे जगणे
पण तुझे माझ्यापासून फारकत घेणे..
मला टाळून दुसऱ्याशी घरोबा करणे…
मला बुचकळ्यात टाकने…
मला दुःख देऊन जाणे…
नाते तुझे नि माझे नाते
मला कधी नाहीच समजले…
– कवी, पत्रकार महेश गावडे.