कोण नाही भेटणार
मग आम्ही नाही येणार…
वेळ कोण देणार
फोन कोण करणार…
आपुलकीनं मग विचारपूस कोण कशी करणार
कोण नाही भेटणार…
सांगितलेले कस पटणार
कोण कुठ आणि कोण कुठ गुंतला असणार
संदेश गणेश महाराजांचा कोण तरी वाचणार….
मग सर्वच कसे संपर्क साधणार…
जेव्हा हा संदेश कोणी वाचला असणार..
तेव्हा वेळ निघून गेली असणार…
आपल्या एका मनस्वी मित्राची भेट चुकली असणार
त्याची हुरहूर प्रत्येकालाच असणार…
पण कोण काय करणार
वेळेचा हात कोण धरणार…
वेळेला तू तोड थांब अस कोण फर्मान सोडणार
एक मित्र निराश होऊन माघारी परतणार..
ते माझ्या (प्रत्येकाच्या) मनाला लागणार…
कोण नाही भेटणार…
एका सहृदयी मित्राची
ग्रेट भेट राहून गेली असणार…
हाच आहे आपला मित्र परिवार …
गेट टुगेदर ची फक्त चर्चा होत राहणार…
एकत्रित शिक्षण घेऊन 21 वर्ष उलटली असणार…
आपण फक्त मित्रांची एकत्र येण्याची वाट पहात बसणार….
कोण नाही भेटणार…?
– महेश गंगाराम गावडे????