तुझ्याशिवाय लागत नाही मन
तुझ हवं आहे मला आपलेपण
तुझ्यासाठी झुरतोय मी
काय आहे माझ्यात कमी
तुला सर्वस्व मानतोय मी
तुझ्या प्रेमाची कुठेच मिळत नाही हमी
मला का सोडून गेलीस तू
खेळ पुरे झाला हा हू तू तू…
तुला शोधून माझ्या चपला झिजल्या
दुखाष्रूनी पापण्या माझ्या भिजल्या…
तू का माझ्याकडे फिरवलीस पाठ
आणि वेगळा मिरवलीस जगण्याचा थाट…
माझ्या प्रेमाचा पेला भरलेला होता काटोकाट..
ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला मी आटोकाट…
पण तुझ प्रेम मिळालंच नाही
बरीच वर्ष पाहिली वाट…
आता तुझा विषय दिला आहे सोडून…
मला एक चांगली मैत्रीण भेटू दे
मंदिराला घातली प्रदक्षिणा आणि वर मागितला देवाकडे – महेश गंगाराम गावडे