दुबईचा पाऊस आला धाऊन
अनेकांनी पाहिला निसर्गाचा तांडव डोळे लाऊन
आस्मानी आणि सुलतानी संकट आले डोळे वटारून
पाणीच पाणी झाले
चहूकडे बादली भर भरून वाहिली तरी पाणी थांबेना वाट पाहून…
उंट गेले पुराच्या पाण्यात वाहून
वाळवंटातील जहाज आता कोठे शोधायचे दुःख झाले आले गहिवरून…
प्रगतीचे इमले, डोळे दिपवणारी झगमगाट
आणि जगण्याचा थाट.. माट…हा एक जणू भास….श्रीमंतीचे चोचले पुरवणारे घोसले…
एक दिवस तोही जाईल फुका होऊन…
निसर्गाला जपा आता जीवापाड…
आसवेदनशिल होऊ नका, नाहीतर व्हाल उसाचे चिपाड…
स्वार्थी, आपमतलबी, कृतघ्न मानव जातीमुळे
निसर्गाला आली भरती
महणून मानवी संपदेला लागली आहे ओहोटी..
कधी येईल आपल्याला उपरती….
नाहीतर अजूनही उंटाच्या पाठीवर बसून हका शेळ्या…
थांबवा या शेळपट उपाय योजना…
उंट बिचारे ओझे वाहून थकेल…
आणि कधीतरी असल्या संकटामुळे मान टाकेल…
आणि मगच काय निसर्गापुढे तेव्हाच माणूस झुकेल…त्याला त्याची चूक काय ती कळेल…?
आता तरी थांबवा
काढायाच्या निसर्गाच्या कुरापती…
नाजूक पर्यावरण, जैव विविधतेला किती कराल दुखापती…
तुमचे कृत्रिम प्रयोग एकदिवस अंगलट येतील, आनंदाने जगणाऱ्या
सर्वांच्या जीवावर उठतील…
माणूस मग या भूमीवरून कायमचेच नामशेष पावतील….!!!