आली मोठी आपती
वाहून गेली त्यात संपती◊
वादळ आले
होत्याचे नव्हते झाले
ज्वालामुखीचा झाला उद्रेक
मानवाच्या अमानुषपनाचा झाला अतिरेक
झाला धरणीकंप
साऱ्यांच्या शरीराला सुटला भय कंप
झाले भूस्खलन
गाडले गेले अनेकजण
झाली अतीवृष्टी
सकल सृष्टी झाली दुःखी, कष्टी
आला महापूर
पाण्याने गिळंकृत केली सार्वजनिक आणि खाजगी मालमत्ता भरपूर..
वाढले तापमान जागतिक
जीवन जगणे झाले अनेकांना अगतिक
आला कोरोणा
मानवाला जगायला काय हा देईना
आपतीने अनेकांचं जीवन झालं बाधित
सुखाने जगण्याची आशा झाली उध्वस्त कधीच…
कवी, पत्रकार – महेश गंगाराम गावडे